Ad Code

Responsive Advertisement

महिला सन्मान योजना -2023 | Mahila Sanman Yojana Maharashtra 2023

ST प्रवासात सरसकट 50 % सूट, महिला सन्मान योजना सुरू GR आला 



महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. 17-03-2023 पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्यात येणार आहे.


सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करणे बाबत निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.

  •  सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी बसेसमध्ये ५० % सवलत दि. १७/०३/२०२३ पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील.
  • सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने संबोधण्यात येत आहे. सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे.
  • सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.
  • ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये. Mahila Sanman Yojana
  • सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.



महिला सन्मान योजना

  • मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही —महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)
  • सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/- रु.३०/-, रु.४०/- रु.५०/- व रु. १००/- मुल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. “Mahila Sanman Yojana”
  • सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.
  • लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणा-या विनामुल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करणेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.)
  • वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १००% सवलत अनुज्ञेय राहिल.
  • महिला सन्मान योजना ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत अनुज्ञेय
  • महिला सन्मान योजना ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल.
  • सदर सवलतीपोटी येणारी रक्कम मोठया प्रमाणात असल्यामुळे त्याचा कोणत्याही स्तरावर गैरवापर होऊ नये म्हणुन आणि महामंडळास शासनाकडुन मिळणारी प्रतिपुर्ती अचुक मिळावी या करीता आगार लेखाकार यांनी त्याचे लेखापरीक्षण करावयाचे आहे. महिला सवलतीच्या संदर्भात हिशोब तपासणी, लेखा परीक्षणाची पद्धती याबाबतच्या सुचना स्वतंत्र परिपत्रकाव्दारे लेखा शाखेव्दारे निर्गमित करण्यात येणार आहे.

विभाग नियंत्रकांनी विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय लेखाधिकारी, आगार व्यवस्थापक, आगार लेखाकार, स्थानकप्रमुख यांच्या बैठका आयोजीत करुन सदर सवलतीबाबत सविस्तर सुचना द्याव्यात. आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत सवलतीची माहिती सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी व चालक वाहक यांना व्हावी या हेतुने कर्मचारी सुचना फलक, रोकड तिकिट विभाग, स्थानक प्रमुख कार्यालय, प्रवासी सुचना फलक इ. ठिकाणी सदर सवलती बाबतची माहिती वाचनीय व दर्शनीय स्वरुपात प्रसिद्ध करण्यात यावी व वर्तमान पत्रातून सदर सवलतीस प्रसिद्धी




आमचे ब्लॉग आणि पोस्ट कसे आहेत कृपया कमेंट करा,

धन्यवाद !

Post a Comment

0 Comments

Close Menu