नोंदणी, ऑनलाइन अर्ज
देशातील किंवा राज्यातील रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवर असो अथवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागते, त्याचप्रमाणे या अपघातांमध्ये काही नागरिकांना कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वाची योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्याचे ठरविले आहे. हि योजना चार वर्षापूर्वी तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात आखली गेली होती, 16 सप्टेंबर 2020 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी मिळाली आहे, या योजनेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच या योजनेसाठी विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना 2022 या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
अपघात झाल्यानंतर सुरवातीचे काही तास अपघात ग्रस्त व्यक्तीसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते, या अत्यंत महत्वाच्या वेळेला वैद्यकीय क्षेत्रात गोल्डन अवर म्हणतात या कालावधीत जर अपघात ग्रस्त व्यक्तीला वेळेवर प्राथमिक उपचार मिळाले तर त्या व्यत्क्तीचे प्राण वाचू शकतात. या योजनेच्या अंतर्गत अपघात झालेला नागरिक कोणत्याही राज्याचा अथवा कोणत्याही देशाचा असला तरी त्यांना योग्य तो उपचार देण्यात येईल, या योजनेच्या अंतर्गत अपघात झालेल्या नागरिकांना गोल्डन अवरमध्ये अत्यंत तत्परतेने वैद्यकीय सेवा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येईल.
- अपघातग्रस्त व्यक्तीस रक्तस्त्राव होत असेल आणि या रुग्णाला वेळेवर स्थलांतरित केले तर रक्त आणि रक्तघटक मिळून रुग्णाचे प्राण वाचवता येईल, तसेच जर अपघातग्रस्त व्यक्तीच्या मेंदूला इजा झाली असल्यास रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन देऊन आणि योग्य पद्धतीने स्थलांतरित केले तर अशा व्यक्तीचे प्राण वाचेल तसेच त्याच्या मेंदूला इजा कमी होण्यास मदत होईल.
- या योजनेच्या अंतर्गत रस्त्यावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला त्यांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा पहिल्या 72 तासांसाठी जवळच्या अंगीकृत हॉस्पिटलमध्ये 74 उपचार पद्धतीच्या माध्यमातून देण्यात येतील.
- स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना च्या अंतर्गत अपघात झालेल्या नागरिकांना पूर्णपणे विनामुल्य वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात येईल.
- बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत अपघात झालेल्या व्यक्तीला 30,000/- रुपये पर्यंतचा खर्च अंतिम केलेल्या पॅकेज दरानुसार या योजनेंतर्गत अंगीकृत हॉस्पिटला विमाकंपनी कडून अदा करण्यात येईल.
- अपघातग्रस्त रुग्णाला स्थलांतरित करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास अशा सुविधा उपलब्ध असलेल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये 108 रुग्णवाहिकेने स्थलांतरित केले जाईल, जर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेने स्थलांतरित केले जाईल अशा परीस्थित पॅकेजच्या दराव्यतिरिक्त 1000/- र
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना मुख्य
योजनेचे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना, राज्यमहाराष्ट्र
व्दारा सुरुवात महाराष्ट्र शासन
लाभार्थी राज्याचे नागरिक
उद्देश्य अपघातग्रस्त व्यक्तीला पहिल्या 72 तासात तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे
वर्ष 16 सप्टेंबर 2020
विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
स्व. बाळसाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना उद्देश
महाराष्ट्र राज्यात नागरिकांना तत्परतेने गोल्डन अवर मध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्व. बाळसाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत शासनाचा उद्देश आहे अपघातग्रस्त नागरिकांना 74 उपचार पद्धतीतून जवळपास 30.000/- रुपयांपर्यंतचा खर्च विनामुल्य केला जाईल, त्याचबरोबर यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डा मधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयातील वास्तव्यातील भोजन यांचा समावेश असेल. स्व. बाळसाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा उद्देश अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध करून देणे जेणेकरून अपघातग्रस्त नागरिकाचे प्राण वाचविता येईल, आणि हे अपघातग्रस्त नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारे लाभ
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा महाराष्ट्रातील ग्रामीण अथवा महामार्गावर होणाऱ्या अपघातामधील जखमींना लाभ मिळणार आहे. हि योजना राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत मोलाची आणि जीवनदायी ठरणार आहे, अपघातग्रस्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही राज्यातील किंवा देशातील असला तरीही त्यांना या योजनेंतर्गत योग्य वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत.
- या योजनेच्या अंतर्गत अपघातग्रस्तांना 108 रुग्णवाहिकेने किंवा उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णवाहिकेने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल
- हॉस्पिटलमध्ये (कॅशलेस हॉस्पिटलायझेशन) तत्काळ दाखल करण्याची सुविधा
- अपघात झालेल्या रुग्णावर तीन दिवसापर्यंत रुग्णालयात उपचार
- रुग्णाला घरी किंवा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहचविण्याची जवाबदारी.
- यासाठी एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकेचा अतिरिक्त खर्चही सरकार करेल.
- या योजनेंतर्गत 30,000/- रुपयांच्या विमा संरक्षणांतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल कर
या योजनेमध्ये समविष्ट नाही :-
- या योजनेंतर्गत घरी घडलेले अपघात किंवा दैनंदिन कामातून घडलेले अपघात तसेच औद्योगिकी अपघात आणि रेल्वे अपघात यांचा समावेश नाही.
- तसेच स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेतलेला व्यक्ती किंवा दारूच्या नशेत असलेला व्यक्ती अथवा राज्याच्या बाहेर अपघात झालेला व्यक्तीला उपचारासाठी या योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळणार नाही.
- अपघातग्रस्त हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून 72 तासापर्यंत खालीलप्रमाणे निशुल्क वैद्यकीय सेवा अनुज्ञेय राहतील.
- अपघातग्रस्त व्यक्तीच्या जखमेतून होणारा रक्त प्रवाह थांबविणे, जखमेला टाके घालणे आणि तसेच ड्रेसिंग करणे असे प्राथमिक उपचार करणे.
- अतिदक्षता विभाग, वार्डामधील उपचार
- अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जाळाल्यामुळे झालेली दुखापत आणि यावरील उपचार.
- अस्थिभंग रुग्णांसाठी आकस्मिक परिस्थितीला लागणारे इम्प्लांटस् देणे.
- रुग्णास साधारण रक्तस्त्राव झाला असेल तर रक्त देणे, अतिरिक्त रक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी.सी.वी. देणे, अपघातामुळे जळालेला रुग्ण आल्यास आवश्यकतेनुसार रक्त घटक देणे, अपघातामुळे अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे आवश्यकतेनुसार ताजे रक्त किंवा रक्त घटक देणे.
- तज्ञांनी सुचविलेला 74 प्रोसिजर्स मधील विविध तपासण्या व औषधोपचार.
- रुग्णांच्या रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन.
विमा कंपनीच्या प्रीमियम बाबत अटी :-
विमा कंपनीने प्रतीव्यक्ती प्रतीवर्षी असा प्रीमियम सादर करणे आवश्यक राहील. रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभार्थी असेल आणि रुग्णावरील उपचार योजनेच्या उपचारांपैकी असेल व रुग्णालय योजनेंतर्गत अंगीकृत असेल तर रुग्णालयास या योजनेंतर्गत पॅकेज रक्कम देय नाही.
आमचे ब्लॉग आणि पोस्ट कसे आहेत कृपया कमेंट करा,
धन्यवाद !
0 Comments