नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
– नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर झालेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाच्या अशा योजना जाहीर करण्यात आलेले आहेत त्यापैकी एक म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना आता आपल्या शेतकरी बळीराजाला वर्षाला 12,000 हजार रुपये हे मिळणार आहे ते कसे आपण पुढे पाहूया.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी
- प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत आपले केंद्र शासन हे सहा हजार रुपये देणार असून त्याबरोबरच महाराष्ट्र शासन सहा हजार रुपये देणार आहेत असे शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपले सरकार जमा करणार आहे.
आता तुम्ही म्हणाल की यामध्ये कोण कोणते शेतकरी पात्र आहे तर ज्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्याच शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनातर्फे एकूण सहा हजार रुपये मिळतील म्हणजेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोन्हीकडून वर्षाला 12 हजार रुपये दिले जाते हा महत्त्वपूर्ण निर्णय आता बजेटमध्ये म्हणजेच अर्थसंकल्प मध्ये घेण्यात आलेला आहे.
आमचे ब्लॉग आणि पोस्ट कसे आहेत कृपया कमेंट करा,
धन्यवाद !
0 Comments