स्वाधार योजना 2023
भारत देश हा एक विकासशील देश आहे, त्यामुळे देशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये विकास होत आहे, औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास होत आहे, तसेच या औद्योगिक क्षेत्रांमध्ये विकासाप्रमाणे कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांबरोबर शिक्षण शेत्रात सुद्धा मोठयाप्रमाणात विकास होत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक/बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे, तसेच या महाविद्यालयांमध्ये व्यवसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या वाढत आहे, या विद्यार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी असतात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडतात.
अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश वेळा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, या सर्व विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी हि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 सुरु केली आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधित पूर्ण करता यावे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण महाराष्ट्र स्वाधार योजना, या योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसेकी योजनेसाठी लागणारी पात्रता, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लाभ आणि अर्ज करण्याची पद्धत इत्यादी माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 संपूर्ण माहिती
राज्यात वाढत असलेली व्यावसायिक आणि बिगरयासाठी आवश्यक असलेली अनुदानाची रक्कम सबंधित अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे वितरीत करण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सन 2017 च्या निर्णयानुसार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आणि त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यामुळे त्यांचे उच्च शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासात बाधा निर्माण होते. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेता याव्या.
स्वाधार योजना 2023 महाराष्ट्र वैशिष्ट्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 हि योजना महाराष्ट्र शासनाने 2016 ते 2017 मध्ये सुरु केली. हि योजना एक शैक्षणिक योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणारे तसेच इयत्ता अकरावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण घेण्यात सहायता करण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत अनुदानाच्या रुपात आर्थिक मदत केल्या जाते.
- महाराष्ट्र स्वाधार योजना या योजनेचा लाभ राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील कुटुंबातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे.
- स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक सहायता केली जाईल.
- स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी पदवी, डिप्लोमा तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी किंवा 12वी, पदवी / पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मर्यादा 50 टक्के असेल.
महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत मिळणारे लाभ
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी, 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निवासाची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे अनुदानाची रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
मिळणारा भत्ता मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या सारख्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ''क'' वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम उर्वरित क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम
भोजन भत्ता 32,000/- रुपये 28,000/- रुपये 25,000/- रुपये
निवास भत्ता 20,000/- रुपये 15,000/- रुपये 12,000/- रुपये
निर्वाह भत्ता 8,000/- रुपये 8,000/- रुपये 6,000/- रुपये
असा एकूण भत्ता 60,000/- रुपये 51,000/- रुपये 43,000/- रुपये
वरील अनुदानाच्या धनराशी व्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपये आणि अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 उद्देश
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करतांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना समोर जावे लागते, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा होतकरू आणि गुणवंत अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, तसेच त्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करता यावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाची सोय व इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरुपात या विद्यार्थ्यांची आर्थिक सहायता केली जाते.
आमचे ब्लॉग आणि पोस्ट कसे आहेत कृपया कमेंट करा,
धन्यवाद !
0 Comments